बुधवार, २७ मे, २०२०

  #पन्या:

सगळेच आपले घरात बसून... ,मग या डॉनला आला कंटाळा आणि भर दुपारी 12 वाजता डायरेक्ट पळत किचनमध्ये. तिच्या अचानक पळापळीने माझे वडिल वैतागून- पन्या, कुठूनही पळत एकदम किचनमध्ये नाही जायचं अजिबात.

पन्या- कुठूनही नाही काही, आमच्या घरातून इथेच आलेय मी.

बाबा-अग पण आत्ता कशी आलीस तू?

तोवर तिचे पिताश्री मा. मुकेश साहेबांची गगनभेदी आरोळी ऐकू आली- पन्या, मार खाशील आता खूप .

मी: काय केलंस ग? पपा का ओरडतायत?

पन्या: काही नाही, मी दंगा केला, दिदीशी भांडले म्हणून.

मी: जा आधी घरी, सॉरी म्हण पपाना, मग ये.

पन्या: काही नाही होत. दिदीला ओरडायच तर मलाच ओरडतात.

मी: अग, जाऊन तर ये, पप्पा खरंच मार देतील.

पन्या: impossible. पप्पा मला मारत नाहीत. त्यांच्या छातीत दुखतं खूप मला मारलं तर. सिम्पल knowledge

मी: छातीत दुखतं? हे काय आता? तुला कुणी सांगितलं?

पन्या:पप्पा च म्हणतात. मागे एकदा मी खू sssप लहान होते ना, तेव्हा ममीने माझं नाव त्यांना सांगितलं, मी दंगा करते म्हणून. मग मला मारलेलं पप्पांनी. दोन फटके मारले आणि मी खूप रडायला लागले. आणि मग त्यांच्या छातीत दुखायला लागलं एकदम.

आता हा प्रकार नवीनच. मी नवऱ्याला म्हणाले हे मुकेशच दुखणं माहीतच नाही रे आपल्याला.. विचारू त्याला.

नवरा प्रचंड आत्मविश्वासाने- काय म्हणाले ग पप्पा तुला मारलं तर?

पन्या: मोठे मोठे डोळे करून पप्पाची acting करत- त्यांनी मला असं असं जवळ घेतलं आणि म्हणाले- पन्या रे... माझं बाळ ग ते... मला नाही आवडत तुला मारायला.. नको ग बाळा असा दंगा करू.. माझं शहाणं लेकरू ग ते.. तुला मारलं की दुखतं ग माझया छातीत. ... ,acting संपवून- तेव्हा मला कळलं की मला मारलं की त्यांच्या छातीत दुखणार. मग आता मी..

मी मध्येच- दंगा करत नाही असाच ना?

पन्या: नै काही... ते घरात नसल्यावर करायचा दंगा. मग त्यांना काही नाही होत.

मी डोक्याला हात लावून बसलेली आणि नवरा मला चिडवतोय- जा विचार मुक्याला, तुला कधीपासून हार्ट ट्रबल आहे ते.

पन्या: हं, आज मी लौकर आलीये तर आपण...आणि माझया वडिलांकडे लक्ष जाताच- लगेच खेळायचं नाही काही. जेवून झोपा तुम्ही. मग 4 वाजता खेळूया आपण. आजोबा, मी आता समजूतदारपणे वागायचं ठरवलंय. मी ओरडणार नाही आता.

माझे वडील: खरं ना? Good girl

पन्या: त्यांच्या कानाजवळून ओरडत- yeyy, 4 वाजता खेळायचं.

वडील: हो, पण तेव्हा ओरडायचं?????

पन्या- खचचून ओरडत- नाही

क्रमशः

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...