May 26,2020
वृद्ध आणि लहान बाळं एकसारखीच असतात असं म्हणतातच ना...
आत्ताच आला त्याचा ताजा ताजा अनुभव.
आमच्या कॅफेचे एक आजीआजोबा अगदी सुरुवातीपासूनचे नियमित
ग्राहक आहेत. 80 गाठलेले. त्यांना जमत नाही
यायला म्हणून आम्ही त्यांना हवं ते घरी देतो. आता माझा नवरा त्यांचा अति लाडका.हा
गेला त्यांच्याकडे की तासभर गप्पा नक्की. आत्ताही तसंच. तो आला तेव्हा म्हटलं
झाल्या का दोन महिन्यांच्या गप्पा?
तर म्हणाला अग नाही. आजचा विषय होता 'आरोग्य सेतू'. मी गेलो
तर म्हणाले तुझ्या फोनमध्ये आहे का आरोग्यसेतू? मी
म्हणालो हो.
तर म्हणाले आमच्या दोघांच्या फोनमध्ये कसं नाही दिसत? मला वाटलं की काही अडचण आहे. मी फोन पाहिला तर त्यात काहीच
नाही.
मग म्हटलं अहो डाउनलोड केला का? तर म्हणे की आम्हाला वाटलं तसाच येणार तो फोनमध्ये
आत्ता दोघांच्या फोनमध्ये तो डाउनलोड करून दिला तेव्हा दोघे
खूष.
खुदकन हसू आलं अगदी.
एका निर्मळ हास्याने दिवसाची सुंदर सुरुवात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा