आमच्या कॅफेजवळ एक भाजीवाला आहे. खरं तर लॉक डाऊन मुळे तो जिथे काम करतो त्या कंपनीत अगदी कमी पगारावर काम करावं लागतंय म्हणून तो भाजी विकतो. चांगला मॅनर्स वाला मुलगा आहे.
आज त्याचा मोबाईल अगदी ड्रेन व्हायला लागला म्हणून आमच्याकडे चार्जिंग ला ठेवला त्याने.
थोड्या वेळात फोन वाजला. नवऱ्याने पाहिलं नाव आणि म्हणाला - अरे बापरे- "जान" आलं बरं का नाव. बायकोचा नंबर मस्त सेव्ह केलाय.
मी: how romantic. हाक मार त्याला लगेच.
एवढं होईतो गेला तो फोन तसाच. मी आपली कशी प्रेमळ आहेत
दोघे यातच
परत 5 मिनिटं गेली आणि आला फोन. नवऱ्याने हाक मारली त्याला आणि सांगितलं, लगेच ये, फोन आहे तुझा.
त्याने ओरडून- कोण आहे हो? नवऱ्याने हळूच
सांगितलं.
तो ओरडून - जान? मी जागेवर नाहीये म्हणून
सांगा. लागला विकायला भाजी![]()
![]()
![]()
नवरा: माझ्याकडे पाहून रानटी हसत- बघ बघ- how romantic