आमच्याकडे एक गृहस्थ नेहमी थालीपीठ घेतात. मराठी भाषिक नाहीत ते. आम्हालाही त्यांना आमच्याकडचं थालीपीठ आवडतं याचं फार कौतुक वाटतं.
आज त्यांनी घेतलं थालीपीठ तेव्हा म्हणाले- मला तुमच्या थालिपीठाची चव आवडतेच, पण त्यापेक्षा मला त्याच्यावरचं डिझाइन फार आवडतं. म्हणूनच मी इथे बसून खातो ते, घरी नेऊन नाही. तुम्ही पार्सल केलं की डिझाइन जातं ना, घडी घातल्यामुळे...
आम्ही दोघे एकमेकांकडे पहातोय. एवढं डिझायनर थालीपीठ आम्ही करतो? आम्हाला कसं माहित नाही हे?
शेवटी नवऱ्याने विचारलंच- कुठलं डिझाइन काका?
तर म्हणाले अरे ही थालीपीठ करते ना, तेव्हा मध्ये नाही का भोकं पाडून फूल करते त्याचं?ते मला बघायला फार आवडतं.![]()
![]()
अरेच्या... युगानुयुगे आपल्या कडे आपण थालीपीठ करताना हे करतोच की. ते चांगलं शिजावं म्हणून. पण इतक्या कौतुकाने ते थालीपीठ पाहून खाणारा रसिक आज पाहिला.. नव्हे कळला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा