कॅफे चालू केल्यास आम्ही इमानदारीत महाराष्ट्रीयन नसलेल्या लोकांना आपल्या न्याहारीच्या पदार्थांची सवय लावतो![]()
खरं तर नुकसान आहेच की आमचं. चांगला चीज प्राठा बटर मारके विकण्या ऐवजी कांदा पोहे, सांजा, वडा, शिरा विकतो. पण मजा येते. पंजाबी मुलं असतील की आंटी- 1 शाबुदाना तो दे दो अशी ऑर्डर असते. मध्ये एकदा ही मुलं खाऊन गेली खिचडी तेव्हा मी नव्हते. आज ऑर्डर अशी आली की अंकल के जैसा रेड शुगर कोटिंग वाला शाबुदाना दे दो. आता अंकल गायब. याने कोणतं रेड शुगर कोटिंग केलं ते फोन करून विचारायची सोय नाही. आंटी- जलदी... म्हणून.
मग काय..फोडणीत किंचित साखर आणि तिखट घातलं आणि झाला रेड शुगर कोटिंग वाला शाबुदाना![]()
![]()
![]()
कुकातकुका![]()
![]()
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा