माझ्या कॅफे च्या जवळ एक 5 वर्षांचा हीरो राहतो. त्याची धाकटी बहीण जेमतेम वर्षाची आहे. पण ती इतकी दंगेखोर आहे की ज्याचं नाव ते. कुठल ही खेळणं टिकत नाही तिच्या राज्यात. आता हा आमचा हीरो तिचा दादा, त्यामुळे बिचारा समजूतदार होऊ पाहतोय.
कधी कधी दुपारी गर्दी नसेल तर येतो हा गडी आमच्याकडे गप्पा मारायला. तसा आता आला. आणि आम्हा दोघांना बहिणीच्या करामती सांगत होता. म्हणाला, आजी तर चिनूला इतकी वैतागली आहे.. मगाशी म्हणाली की असाच दंगा करणारी झाली तर सासरहुन देतील पाठवून. मग कोण लग्न करेल हिच्याशी?
तर मी म्हणालो.. सारखं सारखं तुम्ही मला तिच ऐकायला लावता, तू दादा ना, ती लहान, मग तेव्हापण तसच कराल आणि मलाच करायला लागेल लग्न चिनूशी.
तर मी असा म्हणालो आणि आजीने धपाटा मारला मला एक. आणि ती, आजोबा आणि मम्मी बसले हसत.
हसायला काय झाल आता यांना? असेच तर करतात हे मोठे लोक.
आम्ही दोघे हे ऐकून हसलो तर कट्टी करून गेलाय... ![]()
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा