रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

 

#टिल्लूहॉटेलच्याटिल्लूगोष्टी:

आमच्या कॅफेजवळचा भाजीवाला आला, मोठ्याने आरोळी मारत- मॅडम, आलो मी, नाश्त्याला गरम काय आहे? मला खूप भूक लागलीये.

मी: सगळं आहे. तुला पोहे लागतात ना सकाळी?

भाजीवाला- हो, पण आज नकोत

मी: उपमा?

भाजीवाला- नाक मुरडून ...उंहूं

मी: शिरा?

भाजीवाला- हॅ हॅ , गोड नको

मी: साबुदाणा खिचडी?

भाजीवाला- कालच झाला उपास😢

मी: वडापाव, ब्रेड पॅटीस? पराठा?

भाजीवाला- नको, ऍसिडिटी होते मला. काहीतरी वेगळं द्या ना मला आज..

मी: सामोसा आणि कचोरी करतेय. सामोसा चाट किंवा कचोरी चाट खाणार का?

भाजीवाला: सामोसा नको. कचोरी पण आहे? कचोरी चाट??येयययय...

मी आनंदात- सुटला वाटतं प्रश्न- देऊ का कचोरी चाट?

भाजीवाला: अहो दही खाल्लं की मला सर्दी होते आणि चिंचगुळाचं पाणी खाल्लं की दात शिवशिवतात.

मी- अरे काय नाजूक तू..... मग खाणारेस काय?

भाजीवाला: द्या पोहेच.

मी: हं, आलिया भोगासी

भाजीवाला: काय हो मॅडम?

मी:खा लेका पोहेच तू रोज. उगीच मेनूकार्ड पाठ करून घेतलंस माझं...


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...