April 6, 2020
#पिंपळपान- जुन्या पण अनमोल आठवणी
आज हे फोटोत दिलंय ना, ते वाळलेलं छोटुकलं पान सापडलं, मग त्यावरून आम्ही लगेच भूतकाळाच्या सफरी वर निघालो.
सध्या रामायण चालू
आहे नं, ते पहिल्यांदा लागलं तेव्हा अर्ध्यातूनच कधीतरी पहायला
लागलो. कारण आधी टीव्ही नव्हताच घरी. बाबांचं मत -
शाळेत असताना कशाला
टीव्ही? मग नव्हताच तो. कधीतरी खूपच छान कार्यक्रम
असेल तर बाबांच्या मित्राकडे जायचो पहायला. तिथे बॉसची मुलं आलीत म्हणून बिचार्या काकूंना आम्हाला खाऊ- बिऊ करून द्यायला लागायचा. आत्ता कळतंय त्या कसल्या वैतागत असतील ना? अर्थातच आम्हाला खूप आवडायचं ते आणि आगाउपणाने काकू -
आलू टिक्की करा ना
वगैरेही सांगायचो. बिचार्या..
मग आत्या पेटलीच. तिनं आईला सांगितलं, तू दादाला काही
सांगू नको वहिनी, मी आता बरोबर आणते की नाही बघ इथे टीव्ही. आई आपली नको ग वगैरे करत
होती. पण आत्या तिच्या भावाचीच
बहीण
इतका प्रचंड चालला तो टीव्ही.. गुणाचाच. एक पैसा खर्च करायला लागला नाही कधी. मग मात्र 12-13 वर्षांनी तो ऐकेनासा झाला. एक तर पहा नाहीतर ऐका मोड चालू झाला. खूप पाहिलं पण त्याचे पार्ट्स मिळेचनात. कधी कधी त्याचा मूड असेल तर सिनेमास्कोप व्हायचा. आणि इतका ठळक, स्वच्छ दिसायचा की बास.
शेवटी काय, काढायलाच लागला तो. मग रंगीत आला, आता एलसीडी आला, पण तरी टीव्ही म्हटलं की तो लालचुटुक देखणा sanyo च आठवतो. त्यासारखा तोच..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा