खूप दिवसांपासून काहीतरी भारी , एकदम धिंचाक करायचंच ठरवलं होतं. शेवटी एके दिवशी सरळ उठले, काढली माझी ज्युपिटर आणि सरळ निघाले. वाट फुटेल तिकडे जायचं
ठरवलं. घरी सांगितलंच नाही कुणाला.
अगदीच पहाट. सगळे मस्त झोपलेले. मग तर भन्नाट मूड आला. नाहीतरी आत्तापर्यंत करता
आलं नाही ते करण्याची अजून कुठली चांगली वेळ.. तर निघाले जो sssरात. नाहीतरी कुणीच नाही
रस्त्यावर. फुल टाकी भरून टाकली गाडीची. आता माझी राणी ऐकत नाही कुणाला. चालले मी
झू ssss म करून. वेडीवाकडी वळणं घेत, बिनधास.
अरे वा, का नाही केलं या आधी हे? असं वाटत
जुन्या मुंबई पुणे रोडवरून सरळ मुंबई गाठली ना.. एकदम मस्जिद, क्रॉफर्ड मार्केट, पायधुनी
वरून सरळ जोरात. मध्ये तर अजय देवगण स्टाईल ने एका ट्रक खालून गाडी आडवी पाडून
सुद्धा सुस्साट नेली
दुसर्या क्षणाला काळजीत पडून म्हणाली- सवे, ठीक ना ग सगळं?
मी हो म्हणाले. का गं?
हेमी: ,अग, एकदम लाल, निळे, हिरवे केस काय केलेस? स्पाईक्स
काय? रंगीबेरंगी गॉगल्स? आणि एकटीच
गाडीवर पुणे मुंबई? धनू भावजीना माहीत आहे नं ग? बरी आहेस ना?
मी म्हटलं , अग मस्त.
आपलं ठरलं होतं ना कधी तरी लेह लडाख ला आपण दोघींनीच जायचं? सुम्म मध्ये? म्हणून
आले. कुणाला नाही माहीत. चल आता.
हेमीने काळजीने एकदा पाहिलं माझ्याकडे. ती आणि मी. दोन
सेकंदात हेमी किंचाळली, येस.... चलो, मी येतेच. मी पण नाही सांगणार कुणाला. क्या आयडिया लगाया
बॉस
झालं, फोन सायलेंट वर टाकून जोरात
चाललो आम्ही दोघीच. स्वातंत्र्य हो स्वातंत्र्य..इस्को च बोलते दोस्ती..
पुढे अचानक कसलातरी आवाज कानात घुमायला लागला. वैतागून
पाहिलं तर पहाटेचे पाच आणि आम्ही आमच्या अंथरुणात लोळतोय.
हाततेरी..तरी वाटलंच, इतकं छान
कधी जगलो?
तरीपण हेमे, मी तुला
स्वप्नात का होईना आणलीय फिरवून. ते पण लां sssssss ब
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा