आत्ता लक्ष्मी रोडवरून येत
होतो. पावसामुळे रस्त्यात अर्थातच
पाणी साचलंय. शेजारून एक कार जोरात गेली. काही कारण नाही. मोकाट रस्ता मिळाला, तोही लक्ष्मी रोड. आम्ही पूर्ण पावसाळी पोशाखात, तरीही कमरेपर्यंत पाणी उडलंच. मी रागारागाने पाहिलं त्या
चक्रधराकडे, पण पाणीच साचलंय, तर काय करणार तो तरी, म्हणून
आलो मुकाट.
पण त्यामुळे मागची एक आठवण आली. आर्टिकलशिप करत असताना मी
आणि माझी मैत्रीण कधी कधी आमच्या गाड्यांची अदलाबदल करायचो. माझी गाडी एकदम मड
फ्लॅप वगैरे सगळं असलेली. मैत्रिणीच्या गाडीला काही नाही. तर त्या बदलल्या आणि मी
मैत्रिणीची गाडी घेऊन घरी जायला निघाले. मग आमचा फेमस लॉ कॉलेज रोड लागला. तिथून
जाणाऱ्यांना नक्की माहीत असेल की युगानुयुगे रिमझिम पावसातही तो बुडतो. अगदी
दादरचं हिंदमाता
तो म्हणाला- अग कसली चिडून बघतेस.. माझीच गाडी काय, तुझी गाडी बघ मागे किती पाणी उडवतेय.. मी
:गप रे , माझी गाडी? शक्यच नाही.
तो: मागे बघ आधी. सनी चालवायची ती चालवायची, ती पण पावसात, मग ती असच
करते. तिचं पाणी माझया अंगावर उडलं म्हणून मी तुझया अंगावर उडवलं, समजलं का?
असं म्हणून फर्रsss करून गेला
निघून.
मी विचारात- बावळटच आहे. सनी आणि ऍक्टिवा मधला फरक कळत
नाही. तेवढ्यात पुढच्या पाण्यातल्या अदृश्य खड्ड्यातून मी गेले, मजबूत पाणी उडलंच आणि त्या वेळी लक्षात आलं-
सनी.. सनी चालवतीये मी आज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा