असं पण घडतं
आमचे एक रोजचे कस्टमर आहेत. मार्केटिंग शी संबंधित जॉब असल्याने ते कधीही पार्सल न्यायला येतात. गप्पीष्ट माणूस आहे त्यामुळे आम्हालाही थोडा विरंगुळा असतो.काल असंच झालं. ते आले तर पोळ्या आणि एक भाजी पूर्ण संपलेली. ४ वाजलेले. बरं माणूस असा की मी थांबतो पण तुम्हीच द्या काहीतरी करून. मग म्हणाले पोळ्या कराच पण दुसरी भाजी कोणती आहे?
मी म्हणाले मिक्स उसळ.
यावर म्हणाले- "अरारारा...काय हो हे मॅडम" जरातरी दुसरी भाजी असायला
हवी होती. मी ही असली कडबाकुट्टी नाही
खात.
मला खरं तर वाईट वाटलं. पण म्हटलं ज्याची त्याची आवड. त्यांना म्हटलं आत्ता जास्तीतजास्त कांदाबटाट्याची भाजीच मी देऊ शकते. नाहीतर मग पराठे, धपाटे, थालिपीठं असलं काही चालेल का?
तर म्हणाले कंटाळा आलाय त्याचा. मी सांगू का मॅडम, तुम्ही अशी काहीतरी हेलदी भाजी ठेवायला पाहिजे माहिते?
मी एकदा प्रश्नार्थक पाहून मग नुसतंच हं म्हणाले.
मग म्हणाले काय आहे ती दुसरी भाजी?
मी परत- अहो मिक्स उसळ आहे, mixed sprouts.
ते- आता हे काय? मी सांगतो ना, तुम्ही अशी प्रोटीन्स वाली एखादी भाजी ठेवायला हवी.
यू नो? लोक खूप घेतील.
मी- हो, ठेवीन आता नक्की .
ते- बरं, पण ती दुसरी भाजी नेमकी असते तरी काय?
मी-अहो sss(संपला बहुतेक संयम वगैरे
ते- आयला हो?? ते तर मला भन्नाट आवडतं. आधी नाही सांगायचं का मला? द्या द्या, तेच द्या पार्सल.
मी- हो, देते.
(मनात अत्यंत स्पष्टपणे: मग ते मगाच्ची कडबाकुट्टी? तिचं काय झालं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा