रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

 

आमचा व्हॅलेंटाईन डे:

एक तर आमच्या नवरोबाला हे असले डेज आवडत नाहीत आणि लक्षात तर त्याहून रहात नाहीत.

आत्ता आमच्याकडे आमचे सरदारजी काका आले. चहा गप्पा झाल्या आणि निघाले ते.

स्कूटर वर बसता बसता हळूच विचारलं मला त्यांनी- लाल गुलाब आणला का गं तुझ्यासाठी याने?

मी म्हणाले-'कुठलं काय? एक नंबर चिंगूस आहे.'

काका-" अग काय तू? , चल जा,पटकन हिच्यासाठी गुलाब घेउन ये.आपल्या कोपर्यावरच मिळतायत".

धनू-' हॅ, गुलाब काय? काही नको. मला नाही आवडत हे असलं काही.' प्रेम व्यक्त करायची गोष्ट आहे. गिफ्ट कशाला? गुरुजी, उगीच तिच्या डोक्यात काही भरवू नका.'

काका- 'कसली गं तू? पाठव त्याला लगेच गुलाब आणायला.'

मी-'तो नाहीच जाणार काका'

काका मान उडवून निघून गेले.

मग नवरोजी प्रेमाची व्याख्या वगैरे सांगायच्या बेतात आल्यावर मीच म्हटलं- बास तुझी फिलॉसॉफी.

आता काकांना वॉटस ॅप मेसेज करण्यात आलाय वैतागून- आमच्याकडे थोडक्यात काडी लावून गेल्याबद्द्ल धन्यवाद!

काकांचा मेसेज- रानटी हास्याच्या स्मायल्या.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...