उगीच आपलं-
आज Maya Dnyanesh ची त्रिपुरसुंदरी ची पोस्ट वाचली. भन्नाट पाककृती. ![]()
त्यावरून मला काय आठवावं?
लहान असताना पेपरमध्ये बातमी आली होती. दक्षिणेकडे कुठल्यातरी राज्यात उत्खनन करताना एक मोठा चमचमणारा दगड सापडला. फार चर्चा झाली त्याची आणि नंतर तो तपासला तेव्हा कळालं की अतिशय मौल्यवान असा माणिक होता तो- आपल्या पाटा वरवंटा मधल्या पाट्याच्या आकाराचा आणि त्यातून मोठा होता तो. दैवी वगैरे अशी जाहिरात पण केलेली त्या माणकाची. पुढचं मागचं काही माहीत नाही मला
.
पण असं वाटलं की ती अन्नपूर्णा महादेवाला जेव्हा काही करून वाढत असेल तर तो असाच त्रिपुरसुंदरी अशा अप्रतिम नावाचा आणि चवीचा पदार्थ असेल. सालंकृत अशी ती सौंदर्याची सम्राज्ञी माणकाचा पाटा, पाचूचा वरवंटा आणि त्यावर भिजवलेला सुकामेवा वाटून त्याची पुरणपोळी ती करत असेल आणि महादेव कसले खूष होऊन ती खाऊन तृप्त होत असतील ना...
जय सोमवार!!
जय महादेव!!
आणि जिच्यामुळे हे असलं काय काय आठवलं ती जय माया. तिच्या पोस्टची माया माझ्यावर पडल्याने ही पोस्ट![]()
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा