मंगळवार, ३ मार्च, २०२०

 

 बच्चा गॅंग

आज माझं जी.. तुफानी वाढलंय के,. या मुलांच्या इटुकल्या मेंदूत काय काय चाललेलं असतं आणि कशी चापटर असतात त्याची ही गोष्ट.

सगळी 3 री ते 5 वी ची मुलं लपंडाव खेळत होती आज दुपारी. माझ्याकडचे सगळे जेवून गेले होते मेम्बर्स. त्यामुळे मी एकटी निवांत. मग यांचा खेळ पहात बसले होते. आणि अचानक माझया लक्षात आलं की एका चिमण्यावर काही राज्य येतच नाही. काही केल्या. मग त्या गॅंग मधला एक पाणी प्यायला आला माझ्याकडे तेव्हा म्हटलं अरे त्या *** वर राज्य नाही आलं वाटत अजून.. म्हणजे तो हुशार आहे. तसा आमचा सिद्धू पटकन म्हणाला- अहो काकू, तो कानडी आहे ना, त्यांच्यात राज्य घ्यायची पद्धत नसते. मी - ? कोण म्हणालं?? सिद्धू- तोच म्हणाल.

आता पहा हं, सगळी वय 10 च्या आतली, कानडी मराठी असलं काही नाही इथे. मग खेळात कुठून? म्हणून म्हणाले अरे सिद्धू, मग तुम्ही दगड का माती खेळा आणि त्याच्यावर राज्य द्या. (किती हौस मला ना?? ) सिद्धू म्हणतो पण त्यात देता येईल त्याला राज्य?म्हटलं हो. त्यात जो कानडी असतो त्याच्यावरच राज्य असतं.

झालं, सगळी टीम जमली आणि घनघोर चर्चेअंती त्या मुलाला बोलवून सांगितलं की आता आपण दगड का माती खेळणार आणि त्यात तुझ्यावर राज्य. झालं. त्याला कळेनाच हे काय झालं. कोण? कोण म्हणाल असं की माझ्यावर राज्य? तुम्हाला माहित आहे न मी कानडी आहे आणि आमच्यात राज्य नसतं म्हणून?? ,- तो जोरदार बॅटिंग करत..

सगळी मुलं- हॉटेलवाल्या काकू....त्याच म्हणाल्या. (मी मनात- मेले आता- गरज होती का चोम्बडेपणा करायची?)

हा आला ना. काकू, खरंच दगड का माती मध्ये कानडी मुलावर राज्य असतं?

मी म्हणाले हो. आमच्या मराठी मुलांच्यात असंच असतं.

गुपचूप राज्य घेतलं त्याने. बाकीची टीम खूष.

आणि मग हा आला माझयाकडे.

काकू, खरं सांगा, मगाशी गेम केलात नं माझा?

मी - गेम??? शहाण्या, तू राज्य वाचवायला तुझया टीमला फसवत होतास ते??

मग खाली मान घालून म्हणतोय- मला राज्य घ्यायला नाही ना आवडत, म्हणून ही आयडिया शोधली मी.

मग म्हटलं, खेळताना काय रे कानडी आणि मराठी? तुला कन्नड येतं तरी का?

तर म्हणे काकू, कसल्या भारी आहात हो... नाहीच येत मला कानडी.

म्हटलं, मग आजपासून तू मराठी आहेस. गप राज्य घ्यायचं आलं की. कळालं? नाहीतर इथे दमलास की पाणी नाही देणार.

इतकं बास झालं त्या येडूला.

नको नको, मी नीट खेळणार आता हे प्रॉमिस मिळालं आज


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...