बुधवार, १५ एप्रिल, २०२०

 

#रिकामपणाचेउद्योग:

रंगोली पहात होतो आत्ता आम्ही दोघे. साजन मधलं 'देखा है पहली बार' चालू झालं. मी खू.

ताबडतोब नवरा: भंगार गाणं... बदल तो चॅनेल.

मी- भंगार?? बरा आहेस ना? मला आवडतं हे गाणं, डान्स

नवरा- आवडतो का? म्युट कर एक मिनिट. कर तर

मी - वैतागून म्युट करत- बोल आता

नवरा- गाणं छान आहे कबूल. आता म्युट केलाय ना टीव्ही, तर डान्स पहा कसा आहे. मग सांग मला.

आणि खरंच सांगते- इतका भयाण , तरी विनोदी डान्स असेल असं वाटलंच नाही. कबूल करायलाच लागलं.

हे कबूल करताच माझा सिनेमाशत्रू नवरा- डान्स पहायचा असेल आणि तो छान आहे म्हणायचं असेल तर असा बघ आधी. आणि तो हीरो कोण आहे?

मी: अरे सलमान आहे. इतकं पण नाही माहीत तुला?

नवरा: च्यायला, हा, याचे भाऊ- सगळ्यांची तोंडं नेती करण्याचं भांडं असतं ना, तसं चंबू आहे. हीरो म्हणे. आणि बघा यांचे सिनेमे तिकिटे काढून...

मी: काय करणार? टीव्ही बंद केला. अजून काय?

काsssही होऊ शकत नाही याचं या जन्मात.

असं असलं तरी डान्सबद्दल नवऱ्याशी अति सहमत

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...