सोमवार, ८ जून, २०२०

 

आत्ताचा ताजा अनुभव. मी आणि नवरा किराणा खरेदीसाठी आमच्या इथल्या सुपर मार्केट मध्ये गेलो होतो. खूप काही आणायचं नव्हतं. पार्किंग ला जागा नाही म्हणून मी गाडी घेऊन बाहेर थांबले आणि नवरा आत गेला. 5 मिनिटात एक भिकाऱ्यासारखी दिसणारी मुलगी आली. आणि सरळ- पचास रुपया दे दो म्हणाली मी लक्ष दिलं नाही तर तेच अंगचटीला येऊन तुम्हाला हात लावून पैसे मागणं चालू. मी अजिबात लक्ष दिलं नाही, तर अजून 2-3 मुली- पेप्सी लेके दे दो, भुजिया का बडा पॅक दो म्हणाल्या. कमाल आहे. नंतर त्यांची आई वाटावी अशी बाई आली आणि म्हणे राशन के लिए पैसा दो कुठंही भीक मागितली असं वाटणारच नाही. दंडेलशाही आणि आगाऊपणा. मी म्हणाले खरं, पैसा खुद कमाओ और खरीदो जो चाहीये वो. निर्लज्जपणे दुसऱ्या गिर्हाईकामागे गेल्या खूप घाणेरडं हसत. शी! किळस आली खरं तर. आणि सिक्युरिटी गार्ड ला काही बोलावं तर तो मोबाईल वर कुणाशीतरी महाचर्चेत गुंग. जबरदस्त लागेबांधे असणार या लोकांचे. घाबरतच नाहीत.

ते अंगचटीला येणं आणि हात लावून लावून पैसे मागणं म्हणजे यक्क आणि हेच त्या लोकांना नीट कळतं.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...