गुरुवार, २ जुलै, २०२०

 

आत्ता कॅफेला येतानाची गोष्ट. सिग्नल ला थांबलो असताना एक कुत्रामालक आपल्या गोंडस पोमेरियनला फिरवत आला समोरून. पोमेरियनला सकाळची घाई झाली होती ते रस्त्यात बसायला लागलं, तसा आमचा नवरोजी जोरात हाड, रस्त्यावर बसता काय?? करून ओरडला. कुत्रं एकदम भेदरून मालकाकडे पहायला लागलं. मी म्हणाले- अरे ते तरी काय करणार? ओरडतो काय?

यावर नवरोजी शांतपणे- मी कुत्र्याच्या मालकाला हाड केलंय. कुत्र्याला नाही. आपल्या कुत्र्याबद्दलची जबाबदारी न कळणार्या माणसाला हाड च करायला हवं.

सिग्नल सुटला. मी मागे पाहिलं तर कुत्रं केविलवाणेपणाने मालकाकडे पहातंय, मालक एक रागाचा कटाक्ष नवर्याकडे टाकतोय, बाकीचे लोक त्याला बघून हसतायत आणि नवरा सगळ्यांच्या वरचढ खवचट लुक त्या मालकाला देतोय. बेस्टच

झाली गुड मॉर्निंग


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...